घरCORONA UPDATEतिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय मान्यत कशी दिली? कोव्हॅक्सिन लसीच्या परवानगीवरुन काँग्रेसचा सवाल

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय मान्यत कशी दिली? कोव्हॅक्सिन लसीच्या परवानगीवरुन काँग्रेसचा सवाल

Subscribe

भारत बायोटेकच्या लसीला DCGI ने परवानगी दिल्यानंतर आता राजकीय वाद सुरु झाला आहे. शशी थरूर आणि जयराम रमेश काँग्रेसच्या या दोन बड्या नेत्यांनी भारत बायोटेकच्या लसीला मान्यता देण्यावरुन चिंता व्यक्त केली आहे. कोवॅक्सिनच्या लसीचा अद्याप तिसरा टप्पा पूर्ण झालेला नसताना परवानगी देण्यात आली असून हे धोकादायक ठरू शकतं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर म्हणाले. काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जाब विचारला आहे.

आज ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. DGCI च्या मान्यतेनंतर लसीकरणाला सुरुवात करु शकतो. मात्र, कोवॅक्सिनची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी अद्याप झाली नसल्याचं काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्या लसीला दिलेली परवानगी अपरिपक्व आहे आणि हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. याबाबत हर्षवर्धन यांना स्पष्टीकरण द्यावं, असं थरूर म्हणाले. त्याची चाचणी पूर्ण होईपर्यंत याचा वापर करू नये. तोपर्यंत भारताने अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लस वापराव्यात.

- Advertisement -

शशी थरूर यांच्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की भारत बायोटेक ही एक नवीन कंपनी आहे, परंतु हे आश्चर्यकारक आहे की कोवॅक्सिनसाठी फेज तीनशी संबंधित प्रोटोकॉलमध्ये बदल केले जात आहेत. या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना स्पष्टीकरण द्यावं.


हेही वाचा – DCGI ची मोठी घोषणा! कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -