घरदेश-विदेशमोदींची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गायब; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला

मोदींची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गायब; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला

Subscribe

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी अर्थव्यवस्था, बेरोजगारी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोदींची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गायब झाली असून त्यांना प्रश्न विचारल्यावर उत्तरं देखील गायब झाली आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. शिवाय त्यांनी नोटबंदी, रोजगार, अर्थव्यवस्थेवरुन राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. “देशात १२ कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गायब, सर्वसामान्यांचे उत्पन्न गायब, देशाची समृद्धी आणि सुरक्षा गायब, आपण एखादा प्रश्न विचारल्यास उत्तर गायब,” असं ट्विट केलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी गुरुवारी नोटबंदी हा भारतातील गरीब-शेतमजुरांवर हल्ला आहे, असं म्हटलं. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदींनी ५००-१००० च्या नोटा बंद केल्या. यानंतर संपूर्ण देश बँकेसमोर उभा राहिला. असं केल्याने काळा पैसा मिटला का? लोकांना याचा फायदा झाला का? असा सवाल राहुल गांधींनी केला. दोघांचे उत्तर नाही आहे, असं देखील राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी म्हणाले की, नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला. घरातून तुमचे पैसे काढून ते वापरुन श्रीमंतांचे कर्ज माफ केलं गेलं. देशातील असंघटित क्षेत्र रोख रकमेवर काम करतो, नोटबंदी करुन कॅशलेस भारत करायचा होता, जर असं झालं तर हे क्षेत्र संपेल. त्यामुळे शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागला. छोटे उद्योग रोखशिवाय जगू शकत नाहीत. नोटबंदीचा हा हल्ला आपण ओळखला पाहिजे आणि त्याविरुद्ध देशाला संघर्ष करावा लागला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -