आत्मनिर्भर बना कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

congress mp rahul gandhi criticized pm narendra modi

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. यावरुन संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोरोनावरुन टीका केली आहे. अनियोजित लॉकडाऊनमुळे कोरोना देशभरात पसरला. अनियोजित लॉकडाऊन ही एका अंहकारी व्यक्तीची देण असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला आहे.

देशातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाबद्दल राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. “कोरोनाची रुग्णसंख्या या आठवड्यात ५० लाख आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १० लाखांच्या पुढे जाईल. अनियोजित लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अंहकाराची देण आहे, ज्यामुळे कोरोना देशभर पसरला. मोदी सरकारने आत्मनिर्भर व्हा असं सांगितलं आहे. म्हणजेच स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.