काँग्रेस खासदाराची गाडी संसद परिसरात शिरल्यामुळे गोंधळ

काँग्रेस खासदारांची गाडी संसद परिसरात शिरल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. ही गाडी चुकीच्या प्रवेशद्वारामार्फत संसदेत परिसरात शिरली होती.

New Delhi
Congress MP’s car rams into Parliament barricade
काँग्रेस खासदाराची गाडी संसद परिसरात शिरल्यामुळे गोंधळ

एका काँग्रेस खासदाराची गाडी मंगळवारी चुकीच्या प्रवेशद्वारातून संसद परिसरात घुसली आणि दुभाजकाला धडकली. त्यामुळे संसद परिसरात मोठा आवाज आला. गाडी चुकीच्या प्रवेशद्वारातून येऊन दुभाजकाला धडकली त्यामुळे संसद परिसरातील सुरक्षा यंत्रणेने ताबडतोब हाय अलर्ट जारी केले आणि संसदेत भितीचे वातावरण निर्माण झाले. थोड्या वेळाने सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासणीत ही कार मणिपूरचे काँग्रेस पक्षाचे खासदार थोकचोम मेनिया यांची असल्याचे उघड झाले.

सुरक्षा यंत्रणेची अलार्म वाजला

या कारचा बूमला चुकून स्पर्श झाला आणि सुरक्षा यंत्रणेचा अलार्म वाजला. यामुळे सुरक्षा रक्षक सतर्क झाले. त्यांनी संपूर्ण संसद परसरात हाय अलर्ट जारी केले. यामुळे संसद परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा रक्षकांनी आपले लक्ष गेटच्या दिशेला केंद्रित केले. गाडीची एअर बॅगही निघाली. सुरक्षा रक्षक हिंमत करुन गाडी जवळ पोहोचले तिथे गाडी चालक किरकोळ जखमी झाल्याचा आढळला. पोलिसांनी त्या गाडी चालकाची चौकशी केली असता ती गाडी काँग्रेस खासदाराची गाडी असल्याचे उघड झाले.

२००१ मध्ये दहशतवादी याच गेटने शिरले होते

२००१ मध्ये संसदेत दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी दहशतवादी याच गेटने संसद परिसरात शिरले होते. त्यामुळे या गाडीचे गूढ जोपर्यंत गूढ होते, तोपर्यंत संसद परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केले होते. पंरतु, या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत. २००१ साली अतिरेकी याच गेटने आत शिरले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा – VIDEO: मोदींच्या सभेत भाजप मंत्र्याने महिला मंत्र्याचा केला विनयभंग