नरेंद्र मोदींच्या संपत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत काँग्रेस मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट करणार आहेत.

New Delhi
congress party president rahul gandi will be disclosed the information of PM Narendra modi property
नरेंद्र मोदींच्या संपत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट?

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. देशात पहिल्या टप्प्याचे मतदानही पार पडले आहे. १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. दरम्यान, या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत गोप्यस्फोट करणार आहेत. आज दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट करणार आहेत.

आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण

सध्या देशभरात प्रत्येक पक्षाच्या प्रचारसभा सुरु आहेत. प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण गाजताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. याशिवाय सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि शहीद जवानांच्या नावाने मत मागत आहे. त्याचबरोबर काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशाचा कुठल्याच प्रकारचा विकास केलेला नाही, असा आरोप मोदी करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून राफेल करारावरुन नरेंद्र मोदींवर टीका करण्यात येता आहे. राफेल प्रकरणात नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार केला, असा आरोप राहुल गांधींकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट काँग्रस करणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here