राहुल गांधींना नितीन गडकरींचं ‘हे’ म्हणणं पटलं!

महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरु आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहे. आरक्षण द्यायला नोकऱ्या आहेत तरी कुठे असे वक्तव्य गडकरींनी केले होते. त्याच्या या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांनी त्यांच्यावर ट्वीटरवरुन टीका केली आहे.

Delhi
nitin gadkari
केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘आरक्षण द्यायला नोकऱ्या आहेत कुठे?’ असे वक्तव्य गडकरी यांनी केले होते. या वक्तव्यावरुन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट गडकरींवर निशाणा साधला आहे. गडकरींनी योग्य प्रश्न विचारला असल्याची टीका राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन केली आहे.

आरक्षण दिले तरी नोकऱ्या कुठेत?

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या आंदोलनावरुन नितीन गडकरी यांनी रविवारी जे वक्तव्य केले त्यामुळे ते अडचणीत आले आहे. जरी आरक्षण दिले गेले तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही, कारण नोकऱ्या नाहीत असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते. तसंच सरकारी नोकर भरती थांबली आहे. बँकेमध्ये आयटीमुळे नोकऱ्या कमी झाल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

राहुल गांधींची ट्विटरवरुन टीका

गडकरींच्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी थेट त्यांच्यावर टीका केली आहे. ‘गडकरीजींनी योग्य प्रश्न विचारला आहे. आज सर्व भारतीय हाच प्रश्न सरकारला विचारत आहे की, नोकऱ्या कुठे आहे?’ असा सवाल राहूल गांधी यांनी केला आहे. तसंच ‘नितीन गडकरी हे भाजपचे पहिले मंत्री आहेत ज्यांनी सत्य आणि धैर्याने देशातील जनात विचारत असलेला प्रश्न उपस्थित करत आहे’, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

गरीबाला कोणतिही जात, पंथ नसते

गरीब गरीब असतो. त्यााला कोणतिही जात, पंथ आणि भाषा नसते. त्याचा कोणताही धर्म असो. मुस्लिम, हिंदू किंवा मराठा असो. समाजात एक वर्ग असा आहे ज्याला अंगावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही. त्यामुळे समाजामध्ये जो खूपच गरीब आहे त्याचाही विचार केला पाहिजे असे वक्तव्य गडकरींनी केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here