घरदेश-विदेशराहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली

राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक २०१९ साठी कंबर कसली असून सोमवारपासून ते मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून प्रचाराला सुरूवात करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १७ सप्टेंबरपासून मध्य प्रदेशातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. पुढील आठवड्यात मध्य प्रदेशातील लालघाटीमधून रोड शो करत प्रचाराला सुरूवात करणार आहेत. हा रोड शो भेळ दसरा मैदानात संपुष्टात येईल. दरम्यान, राहुल गांधी या भोपाळमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटी (एमपीसीस) अध्यक्ष कमल नाथ यांनी राहुल गांधी १७ सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा केली आहे. तर १८ सप्टेंबरला राहुल गांधी आंध्र प्रदेशला जाण्यासाठी रवाना होणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी २७ आणि २८ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील सत्ना आणि रेवा या शहरांमध्ये निवडणूकीसाठी प्रचार करणार आहेत.

- Advertisement -

आंध्र प्रदेश आणि राजस्थानलाही भेट देणार 

मध्य प्रदेश दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी आंध्र प्रदेशच्या कुरनूलसाठी प्रवास करणारे राहुल गांधी २० सप्टेंबर रोजी राजस्थानच्या डुंगापूरसाठी रवाना होणार आहेत. या ठिकाणी ते आदिवासी पाड्यातील नागरीकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला तीन लाखांहून अधिक स्थानिकांची उपस्थिती असेल, असे राज्यातील काँग्रेस प्रवक्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार 

काँग्रेस पक्ष राज्यातील ८० उमेदवारांची पहिली यादी बनवण्याची तयारी करत असल्याचे यापूर्वीच एमपीसीसी अध्यक्ष कमल नाथ जाहीर केले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे अध्यक्ष भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मतदार संघात येण्यापूर्वी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतील असे समजले जाते. ही यादी उद्या, १५ सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -