मोदींना रावण तर राहुलला बनवले राम; काँग्रेसची पोस्टरबाजी

राहुल गांधी मोदींवर वारंवार राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन निशाणा साधत असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेशात काँग्रेसने राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पोस्टरबाजी केली आहे.

Mumbai
mp-congress-poster
मध्य प्रदेशात काँग्रेसची पोस्टरबाजी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु असलेल्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरीत मध्य प्रदेशमध्ये वेगळीच घटना समोर आली आहे. एकीकडे राहुल गांधी मोदींवर वारंवार राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन निशाणा साधत असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेशात काँग्रेसने राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पोस्टरबाजी केली आहे. काँग्रेसच्या या पोस्टरवर मोदींना दाह तोंडी रावण तर राहुल गांधींना त्यांच्यावर बाणाने निशाणा साधलेला राम यांच्या रुपात दाखवले आहे.

वाचा – ‘हा घ्या पुरावा; मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले’

चौकीदार चोर है…

‘चोरो तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है. चोरों के अलावा किसी से बैर नहीं’, असा मजकूर या पोस्टरवर देण्यात आले आहे. याशिवाय एका राफेल विमानासह ‘चौकीदार ही चोर है’ ही राहुल गांधींनी दिलेली घोषणादेखील पोस्टरवर आहे. याआधीही अनेकदा राहुल यांना काँग्रेसनं पोस्टरवर राम भक्ताच्या रुपात दाखवलं आहे. मात्र या पोस्टरमधून राम मंदिराच्या मुद्द्याला स्पर्श करत काँग्रेसनं राफेल डीलवरुनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या पोस्टरमध्ये मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. पोस्टरवर मोदींची दहा तोंडं दिसत आहेत. यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चेहरे पोस्टरवर दिसत आहेत.

वाचा – ‘२८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार!’

राहुलचा गंभीर आरोप 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला आहे. ‘मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले’, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नवी दिल्लीमध्ये शुक्रवारी सकाळी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये हा धक्कादायक आरोप केला आहे.