घरदेश-विदेशकर्नाटक मंत्रीमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये बंडाळी

कर्नाटक मंत्रीमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये बंडाळी

Subscribe

कर्नाटकमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कॅबिनेटचा विस्तार केला. यात आठ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळातून थेट बाहेर केल्याने काँग्रेसचे आमदार रमेश जारकिहोली हे नाराज झाले असून त्यांनी थेट काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. तसेच कॅबिनेटमध्ये स्थान न दिल्याने माजी मंत्री रामलिंग रेड्डींसह अनेक काँग्रेस आमदारांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.

रामलिंग रेड्डींच्या समर्थकांनी आज विरोध दर्शवत आंदोलनही केले. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते सदानंद गौडा यांनी नाराज काँग्रेस आमदारांचे भाजप स्वागत करेल, असे म्हटले आहे. यामुळे कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

- Advertisement -

हे आमदार देऊ शकतात राजीनामा

श्रीमंत पाटील यांच्यासह काँग्रेसचा आणखी एक आमदार आणि विधानपरिषदेतील एक आमदार राजीनामा देऊ शकतो. तसेच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री जी . परमेश्वर यांनी आपल्याला कॅबिनेटपासून दूर ठेवल्याचा आरोप या आधी रामलिंग रेड्डी यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -