घरदेश-विदेश'मूळ मुद्यांपासून दुर्लक्ष करण्यासाठी चिदंबरम यांच्यावर कारवाई'

‘मूळ मुद्यांपासून दुर्लक्ष करण्यासाठी चिदंबरम यांच्यावर कारवाई’

Subscribe

मोदी सरकार पी. चिदंबरम यांच्या बहाण्याने देशातील नागरिकांना मुळ मुद्यांपासून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत.

माजी केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई करण्याच्या नावाने मोदी सरकार नागरिकांचे लक्ष्य मुळ मुद्यांपासून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री चिदंबरम यांना अटक केली. आज दुपारी २ वाजता सीबीआय कोर्टात त्यांना हजर केले जाणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्लीच्या मुख्यलयावर पत्रकार परिषद बोलवली. या पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.


हेही वाचा – पी. चिदंबरम यांच्याच हस्ते झाले होते ‘त्या’ सीबीआय कार्यालयाचे उद्घाटन

- Advertisement -

काय म्हणाले सुरजेवाला?

‘भाजप सरकार सीबीआय, ईडी या स्वायत्त संस्थेचा दुरुपयोग करत आहे. मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला साक्षीदार बनवून केस बनवली गेली’, असे सुरजेवाल म्हणाले. त्याचबरोबर चिदंबरम यांच्या बाजूने बोलताना सुरजेवाला म्हणाले की, ‘पी. चिदंबरम हे देशाचे सन्मानित नागरिक आहेत. ते देशाचे माजी अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रिय गृहमंत्री आहेत. याशिवाय ते सुप्रीम कोर्टाचे वकीलही होते. त्यांनी तपासादरम्यान काहीच लपवले नाही. भाजप सरकारकडून चुकीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यांचाजवळ कोणताही पुरावा नाही. ज्या लोकांनी गुन्हे केले आहेत, ते मोकाट फिरत आहेत. ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याचे ४० वर्षे देशासाठी व्यथित केले त्याच व्यक्तीला आता पळकुटा म्हणून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहे.’ पी. चिदंबरम यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर देखील टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -