घरदेश-विदेशकाँग्रेस न्यायव्यवस्थेवर दबाव आणत आहे - नरेंद्र मोदी

काँग्रेस न्यायव्यवस्थेवर दबाव आणत आहे – नरेंद्र मोदी

Subscribe

देशातील सर्वात जुना पक्ष आणि सर्वाधिक काळ देशावर सत्ता गाजवलेला पक्ष सध्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आणत आहे. याबाबत देशाला आणि तरुणांना सावध करण्याची वेळ आल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

देशातील सर्वात जुना पक्ष आणि सर्वाधिक काळ देशावर सत्ता गाजवलेला पक्ष सध्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आणत आहे. याबाबत देशाला आणि तरुणांना सावध करण्याची वेळ आल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. प्रयागराज येथे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा किनाऱ्यावर पूजा केली. यानंतर त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन देखील केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेस पक्ष हा स्वत:ला देशाच्या, लोकशाहीच्या आणि इतर संस्थांच्या वर असल्याचे समजतो. काँग्रेस देशाच्या स्वायत्त संस्थांना त्यांच्या समोर हात जोडून उभे करण्याच्या प्रयत्नात आहे अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साडेचार हजार कोटींच्या योजनांचे भूमीपूजन देखील केले.

वाचा – राफेल करारावरून मोदींची काँग्रेसवर ट्विट ‘फायर’

राफेलवरून काँग्रेस – भाजप 

सध्या राफेल करारावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायाला मिळत आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शहा यांनी राहुल गांधी देशाची माफी मागावी अशी मागणी केली. शिवाय, राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बोफर्स आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा हवाला देत काँग्रेस विशेषत: गांधी घराण्यावर हल्ला चढवला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून सध्या निवडणुकांच्या प्रचाराचा देखील जोर चढताना दिसत आहे. त्यामुळे आता भाजप – काँग्रेसमधील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -