घरदेश-विदेशमध्य प्रदेशात काँग्रेसचा वनवास संपणार?

मध्य प्रदेशात काँग्रेसचा वनवास संपणार?

Subscribe

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकासाठी मतदान प्रक्रिया पार पडताच आता विविध मतदानोत्तर चाचणी (एग्झिट पोल) समोर यायला सुरुवात झाली आहे. या पाचही राज्यात सर्वात मोठे असलेले मध्य प्रदेश राज्य भाजपच्या हातून निसटते की काय? अशी परिस्थिती एग्झिट पोलच्या निष्कर्षावरुन दिसून येत आहे. मध्यप्रदेश राज्यात २८ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज आलेल्या एग्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात तरी काँग्रेसचा वनवास संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ११६ जागांची आवश्यकता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानमुसार सत्ता स्थापनेचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस आणि भाजप पक्षांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला १२६ जागा मिळू शकतात. तर इंडिया टुडेच्या सर्वेनुसार काँग्रेसला ११३ तर भाजपला १११ जागा मिळू शकतात, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

टाइम्स नाऊ – सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार मात्र मध्य प्रदेशमध्ये १२६ जागांसहित भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असे सांगण्यात आले आहे. तर काँग्रेसला ८९ जागा मिळतील. न्यूज एक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १०६ जागा तर काँग्रेसला ११२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीच्या सर्वेक्षणानुसार भाजप ९० ते १०६ जागा जिंकेल तर काँग्रेस ११० ते १२६ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एबीपीच्या सर्वेनुसार भाजप ९४ जागा तर काँग्रेस बहुमतासहित १२६ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाच एक्झिट पोलच्या तुलनेत फक्त एका एक्झिट पोलने भाजपच्या पारड्यात अधिक जागा दिल्या आहेत. तर इतर एक्झिट पोलने काँग्रेसला सत्ता स्थापन करता येईल, असे सांगितले आहे.

- Advertisement -

२००३ पासून मध्य प्रदेश राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र १५ वर्षांनंतर काँग्रेसला इथे सरकार बनवण्याची संधी असल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा निकाल ११ डिसेंबर रोजी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -