घरदेश-विदेशदिग्विजय सिंह यांचा नक्षल्यांशी संबंध?

दिग्विजय सिंह यांचा नक्षल्यांशी संबंध?

Subscribe

दिग्विजय सिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळं त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत. कॉम्रेड प्रकाशनं सुरेंद्र गडलिंगना लिहिलेल्या पत्रामध्ये दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या समोरच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, दिग्विजय सिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळं त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत. कॉम्रेड प्रकाशनं सुरेंद्र गडलिंगना लिहिलेल्या पत्रामध्ये दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल नंबरचा उल्लेख करण्यात आल्यानं सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे दिग्विजय सिंह आणि नक्षलवादी यांचा काय संबंध? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. सुरेंद्र गडलिंग सध्या पोलिस कोठडीत आहे. देशात सध्या नक्षलवाद्याचा मुद्दा जोरात चर्चिला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील प्रचारादरम्यान नक्षलवादाच्या मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. त्यात आता सुरेंद्र गडलिंगला लिहिलेल्या पत्रात दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल नंबरचा उल्लेख झाल्यानं दिग्विजय सिंह यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी देखील दिग्विजय सिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. एल्गार परिषदेच्या तपासात ही माहिती हाती लागली आहे. दरम्यान पुणे पोलिस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत.

वाचा – ‘शहरी नक्षलवाद’ शब्द आला कुठून?

भीमा – कोरेगाव हिंसाचार आणि शहरी नक्षलवाद

भीमा – कोरेगाव हिंसाचाराशी संबंध असल्याच्या आरोपावरून सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा, गौतम नवलखा आणि वरवरा राव यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरूवातीला नजरकैदेत ठेवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वरवरा राव यांना देखील नजरकैदेतून आता अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आले आहे. पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पाठिंबा दिल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

छत्तीसगडमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. यावेळी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद्याच्या मुद्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यात आता दिग्विजय सिंह प्रकरणामुळे काँग्रेससह सिंह यांच्या समोरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

वाचा – अटकेतील कार्यकर्त्यांचा ‘मोदी राज’ संपवण्याचा होता कट – पोलिसांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -