घरदेश-विदेशचारपैकी एका भारतीयाची ऑनलाईन फसवणूक

चारपैकी एका भारतीयाची ऑनलाईन फसवणूक

Subscribe

सध्या वेळेअभावी म्हणा अथवा सोयीस्कर असल्यामुळं बँकांचे व्यवहार असो अथवा कोणत्याही प्रकारचं शॉपिंग असो बरेचदा ऑनलाईन पैशांचा व्यवहार करण्यात येतो. पण सदर अहवालातून साधारण चार भारतीयांमागे एक भारतीय फसवणुकीची शिकार बनत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारतामध्येदेखील आता डिजीटल क्षेत्रामध्ये बरेच जण सक्रिय आहेत. या ऑनलाईन व्यवहारामध्ये वित्तीय फसवणुकीची जोखीमदेखील वाढली आहे. जागतिक वित्तीय सूचना कंपनी एक्सपेरियननं दिलेल्या अहवालानुसार, २४ टक्के भारतीय ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात. सध्या वेळेअभावी म्हणा अथवा सोयीस्कर असल्यामुळं बँकांचे व्यवहार असो अथवा कोणत्याही प्रकारचं शॉपिंग असो, बरेचदा ऑनलाईन पैशांचा व्यवहार करण्यात येतो. पण सदर अहवालातून साधारण चार भारतीयांमागे एक भारतीय फसवणुकीची शिकार बनत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दूरसंचार क्षेत्रात सर्वाधिक फसवणूक

या अहवालामध्ये स्पष्ट केल्यानुसार, दूरसंचार क्षेत्रामध्ये सर्वाधिक ५७ टक्के लोकांना ऑनलाईन फसवणुकीचा सामना करावा लागतो. यानंतर अनुक्रमे बँक (५४ टक्के) आणि रिटेलर्स (४६ टक्के) या क्षेत्रांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त भारतीय बँकांमध्ये माहिती देण्यासाठी ५० टक्के लोक तयारी दर्शवितात. तर ब्रँडेड रिटलर्सना मात्र आपली माहिती देण्यासाठी लोक कचरतात. केवळ ३० टक्के लोकच आपली माहिती रिटेलर्सना देण्यासाठी तयार होतात. भारतामध्ये केवळ ६ टक्के लोकांना आपली गोपनीय माहिती सुरक्षित असल्याचं वाटतं. तर भारताच्या तुलनेत जपानमध्ये हा आकडा सर्वात जास्त अर्थात आठ टक्के आहे.

- Advertisement -

फसवणुकीत भारताचा चौथा क्रमांक

अहवालानुसार, फसवणूक करण्यासाठी माहिती गोळा करण्याच्या बाबतीत भारताचा जगामध्ये चौथा क्रमांक लागतो. हा अहवाल आयडीसीबरोबर सल्लामसलमत करून बनवण्यात आला आहे. हे ऑनलाईन सर्वेक्षण १० एपीएसी बाजार अर्थात ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम येथील उपभोक्त्यांनी दिलेल्या मतावर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -