Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच निवडणुकीसाठी तिकीट मिळत'

‘पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच निवडणुकीसाठी तिकीट मिळत’

पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच त्या महिलेला कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळत', असं वादग्रस्त विधान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केले आहे.

Related Story

- Advertisement -

‘महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर त्या व्यक्तीचा संपर्क पुरुष नेत्याशी असणं गरजेचं आहे. जर महिलेचा पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच त्या महिलेला कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळत’, असं वादग्रस्त विधान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केले आहे. हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या, अशी माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

राजकारणात महिलांना डावललं जातं

विधान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, ‘सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर अनेक महिला असल्याचे आपण पाहिले आहे. परंतु, ही संख्या पाहायला गेली तर फार कमी आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे पाहिला गेले तर राजकारणात देखील महिलांना गरजे इतके प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बऱ्याचदा राजकारणात महिलांना डावललं जातं. तसेच कोणताही राजकीय पक्ष महिला नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यासाठी उत्सूक नसतो. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीची प्रतीमा मलीन झालेली असते. तसेच ज्यांच्याविरोधात गंभीर आरोप असतात’, अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जाते’, असं खळबळजनक विधान शर्मा यांनी केले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर, भारत कितव्या स्थानी?


- Advertisement -