घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona Virus : धोक्याची घंटा, भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे!

Corona Virus : धोक्याची घंटा, भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे!

Subscribe

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असताना भारतामध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या दिवसाला तब्बल ५० ते ६० हजारांच्या घरात वाढते आहे. गुरुवारी देशाच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये ७५ हजार ७६० रुग्णांची भर पडली. आत्तापर्यंत २४ तासांत नव्याने भर पडलेली ही सर्वाधित रुग्णसंख्या आहे. भारतात Lockdown काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना रुग्णसंख्या मात्र मोठ्या संख्येने वाढत असताना आता भारताच्या काळजीत अजून भर पडली आहे. कारण भारतानं आता कोरोनाच्या Active पेशंटच्या संख्येमध्ये (Active Corona Patients in India) ब्राझीलला देखील मागे टाकलं आहे. आत्तापर्यंत या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर तर ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, गुरुवारी भर पडलेल्या नव्या रुग्णसंख्येनंतर भारतानं ब्राझीलला मागे टाकलं आहे.

काय सांगते आकडेवारी?

जगभरातल्या Corona रुग्णसंख्येच्या ताज्या आकडेवारीनुसार आजघडीला अमेरिकेमध्ये सर्वाधिक २ कोटी ५० लाख २ हजार ७६२ इतके Active रुग्ण आहेत. अर्थात, इतक्या रुग्णांवर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. भारतात हाच आकडा आता ७ लाख २९ हजार ७८३ इतका झाला आहे. तर ब्राझीलमध्ये एकूण ६ लाख ९५ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेषत: गंभीर रुग्णांची संख्या देखील भारतात जास्त आहे. भारतात ८ हजार ९४४ रुग्ण गंभीर असून ब्राझीलमध्ये गंभीर रुग्णांचा आकडा ८ हजार ३१४ च्या घरात आहे.

- Advertisement -

अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

दरम्यान, अजूनही अमेरिकेतच जगात सर्वाधिक रुग्ण असून आजपर्यंत तब्बल ६० लाख १ हजार १०३ अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी ३३ लाख १४ हजार ६६४ Active Cases आहेत. १ लाख ८३ हजार ६७७ रुग्णांचा आत्तापर्यंत अमेरिकेत मृत्यू झाला आहे.


वाचा सविस्तर – CoronaVirus: देशात बाधितांचा आकडा ३३ लाखांपार! २४ तासांत ७५,७६० नवे रूग्ण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -