दिल्लीनंतर अहमदाबादमध्येही कोरोनाचा फैलाव वाढला,कडक उपाययोजनांची तयारी

लोकांना मास्क लावणे आणि सोशल डिस्ट्नसिंगचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीनंतर अहमदाबादमध्येही कोरोनाचा फैलाव वाढला,कडक उपाययोजनांची तयारी

राजधानी दिल्लीतील कोराना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे. दिल्लीत वाढते प्रदूषण आणि कोरोनाची वाढती रूग्णसंख्या या दोन्हीचा सामना दिल्लीतील लोकांना करावा लागत आहे. त्यातच आता गुजरातच्या अहमदाबादमध्येही कोरोनाचे रूग्ण वाढत अ सल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता अहमदाबादमध्ये कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ६ पर्यत हा कर्फ्यू असणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू असाच राहणार आहे. लोकांना मास्क लावणे आणि सोशल डिस्ट्नसिंगचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिवाळीनंतर गुजरातमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली. राज्य सरकारने केलेल्या पाहणीत अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट या शहरांमध्ये दिवाळीनंतर कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. गुजरातमध्ये एका दिवसात ९२६ नवीन कोरोनाबाधित समोर आले होते. राज्यात कोरोना व्हायरसची रूग्णसंख्या १ लाख ९० हजाराहून अधिक झाली आहे.

अहमदाबाद शहरात ९०० मेडिकल मोबाईल वॅन, ५५० संजिवनी रथ तर १५० धनवंतरी रथ आहेत. ज्यामार्फत घर बसल्या लोकांना मेडिकल सुविधा मिळत आहे. अहमदाबाद शहरात जवळपास २०० ठिकाणी मोफत कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आत्तापर्यत १ लाख ८० हजार लोकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे


हेही वाचा – पाकिस्तानमध्ये भारतीय सैनिकांकडून पीन पॉईंट स्ट्राईक? लष्काराने केला खुलासा