घरताज्या घडामोडीकोरोनाचे चीनमध्ये थैमान; भारताला मात्र होणार फायदा

कोरोनाचे चीनमध्ये थैमान; भारताला मात्र होणार फायदा

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये इंधनाची मागणी झाली कमी...

चीनमध्ये पसरलेल्या घातक कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. इंटरनॅशनल एनर्जी एंजसीच्या (आईए) अनुमानानुसार यावर्षीच्या पहिल्या तिमाहीतील कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय खप मागच्या वर्षीपेक्षा ४.३५ लाख बॅलरने घटण्याची शक्यता आहे. मागणी घटल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासकांच्या मतानुसार याचा फायदा भारताला होणार आहे. मागच्या एका महिन्यात पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची घसरण झालेली आहे. तसेच पुढच्या आठवड्यात आणखी चार रुपयांनी पेट्रोलचे दर कमी होण्याची शकय्ता अभ्यासक वर्तवत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे बेंट क्रूडचे दर प्रति बॅलर ५६ डॉलरहून कमी होऊन आता ५० डॉलर होऊ शकतात. तर दुसऱ्या बाजुला न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्सचेंज (नायमॅक्स) येथे अमेरिकेच्या लाइट क्रूडचे प्रति बॅलर दर ५२.२३ वरुन घसरुन ४८ डॉलर प्रति बॅरलपर्यंत येऊ शकतात. याच फायदा भारतीय इंधन बाजाराला मिळणार आहे. पुढच्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

आईएने जाहीर केलेल्या अहवालात २०२० च्या पहिल्या तिमाहीत पेट्रोल आणि इतर इंधनाची मागणी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. मागच्या दशकभरातील ही पहिलीच वेळ असणार आहे, ज्यामध्ये इंधनाची मागणी कमी होत आहे. खरंतर याच्या आधी जेव्हा आईएने अहवाल दिला होता तेव्हा मागच्यावर्षीच्या तुलनेत दिवसाला आठ लाख बॅरलने इंधनाची मागणी वाढेल असे सांगण्यात आले होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे चीनमधे हाहाकार उडालेला असताना चीनमधून इंधनाची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळेच २०११ नंतर पहिल्यांदा इंधनाच्या दराची मागणी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हे वाचा – शेतकऱ्याने मुलीचा हट्ट केला पुर्ण, लग्नानंतर पाठवणी केली चक्क हेलिकॉप्टरने!

- Advertisement -

इंथन उप्तादित करणाऱ्या ओपेक राष्ट्रांकडून भारत आणि चीन मोठया प्रमाणावर इंधन आयात करतो. भारत आणि चीनच्या मागणीवर इंधनाचे दर ठरत असतात. सध्या कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये इंधनाची मागणी कमी झाली आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यात चीनला यश आलेले नाही. याचा थेट परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर देखील होताना दिसत आहे. जर कोरोना व्हायरसने इतर देशांमध्येही थैमान घातले तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात.

जाणकारांच्या मते, पुढच्या १० दिवसांत इंधनाच्या दराबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते. इंधनाचे दर कमी झाले तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही दिलासादायक बातमी ठरु शकते. मात्र चीनमध्ये कोरोना व्हायरसने जास्त दिवस मुक्काम ठेवल्यास मात्र भारताला याचा फटका बसू शकतो. कारण भारतातून होणारी निर्यात यामुळे प्रभावित होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -