घरताज्या घडामोडीयंदा दिवाळी, दसरा घरातच; कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत

यंदा दिवाळी, दसरा घरातच; कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत

Subscribe

यंदा मानक संचालन प्रक्रिया (SOPs) जारी करत कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना घरातच सण साजरे करावे लागणार आहे, अशी विनंती करण्यात आली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यंदा सर्वच सण अगदी साध्या पद्धतीने साजरे केले जात आहे. पण, आता दिवाळी सारखा मोठा सण अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे या सणावर कोरोनाच सावट असणार आहे. एकीकडे अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, असे असले तरी सणांच्या काळात लॉकडाऊनचे नियम पाळावे लागणार आहेत. कारण या सणांच्या दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आरोग्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

घरातच सण साजरे करा

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार; यंदा मानक संचालन प्रक्रिया (SOPs) जारी करत कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना घरातच सण साजरे करावे लागणार आहे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी सण साजरे करता येणार नाहीत. इतकेच नाही तर कार्यक्रमाच्या आयोजनावर देखील बंदी असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, ज्याठिकाणी सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशा ठिकाणी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क लावणे, थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटाझरचा वापर करणे अनिर्वाय आहे.


हेही वाचा – Corona: राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -