घरदेश-विदेशधक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला ठेवलं २ दिवस व्हेंटिलेटरवर!

धक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला ठेवलं २ दिवस व्हेंटिलेटरवर!

Subscribe

हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येच दिवसेंदिवस वाढ होत असल्याने डॉक्टर्स आणि कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णावर उपचार करत आहे. मात्र अशा परिस्थितीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोलकत्यात घडला असून बिल वाढवण्यासाठी मृत्यू झाल्यावरही कोरोना रुग्णाला २ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलचे बील वाढविण्यासाठी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तर हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

- Advertisement -

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, हुगळी जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय कोरोना रुग्णाला एका खासगी नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नर्सिंग होमने ३१ ऑगस्टला ४७ हजारांचे बिल दिले. ते बिल भरल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. कोरोना रुग्णाला पाहण्यासाठी कुटुंबीयाने वारंवार विनंती केली होती. मात्र नर्सिंग होमने त्यांना पाहण्याची परवानगी दिली नसल्याचे रुग्णाच्या मुलाने सांगितले आहे.

जेव्हा बिल जमा करण्यात आले त्यानंतर लगेच डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हॉस्पिटलविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, रुग्णाची परिस्थिती गंभीर असताना त्यांना येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना व्हेंटिलेशन सपोर्टवर ठेवणं गरजेचे होते. त्यांची कोरोना चाचणीही झाली नव्हती. चाचणी केली असता त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आल्याचे म्हटले आहे. कोलकाता पोलिसांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.


Coronavirus: २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३९ लाखावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -