घरCORONA UPDATEदिलासादायक: रिकवरी रेट ३९.६२ टक्के; इतर देशांपेक्षा चांगली स्थिती - आरोग्य मंत्रालय

दिलासादायक: रिकवरी रेट ३९.६२ टक्के; इतर देशांपेक्षा चांगली स्थिती – आरोग्य मंत्रालय

Subscribe

भारतातील रिकवरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगा आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ३९.६२ वर पोहोचलेला आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितलं.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि पूर्वे भागात आलेल्या चक्रवादाळावर गृह व आरोग्य मंत्रालयाची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. कोरोना पॉझिटिव्ह आलेले ४२,२९८ लोक बरे झाले आहेत आणि आता सक्रिय रुग्णांची संख्या ६१,१४९ आहे. हे समाधानकारक आहे असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले.

जगातील एकूण लोकसंख्या विचारात घेतल्यास प्रति लाख लोकसंख्येवर ६२ लोक कोरोनाचे संक्रमित झाले आहेत. भारतातल प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे ७.९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनामुळे जगभरात एक लाख लोकसंख्येमागे ४.२ टक्के मृत्यू झाले आहेत. भारतात एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के मृत्यू झाले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – MSMEच्या ३ लाख कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील; अनेक प्रस्तावांना मंजुरी


ते म्हणाले की सक्रिय कोरोना प्रकरणांपैकी सुमारे २.९४ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. ३ टक्के लोकांना आयसीयू आणि ०.४५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. लव्ह अग्रवाल म्हणाले की, जेव्हा पहिला लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा रिकवरी दर ७.१ टक्केच्या आसपास होता. दुसर्‍या लॉकडाऊन दरम्यान रिकवरी दर ११.४२ टक्के होता, नंतर तो २६.५९ पर्यंत वाढला. आज रिकवरी दर ३९.६२ टक्के आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -