जुळ्या मुली जन्मताच झाल्या कोरोना पॉझिटिव्ह; गर्भातच झाला आईपासून संसर्ग

जगात पहिल्यांदा जुळ्या मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या जुळी मुलींचा जन्म ३ जुलै रोजी ब्रिटन येथे झाला. मिरर ऑनलाईनने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाळांच्या आईला कोरोना होता. त्यामुळे गर्भातच या बाळांना कोरोनाचा संसर्ग झाला. डॉक्टरांनी जन्माच्या दुसऱ्याच दिवशी मुलींच्या आई-वडिलांन त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती दिली. ब्रिटनच्या ३२ वर्षीय सारा यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र त्यांच्या जुळ्या मुलींना कोरोची लागण झाली. डॉक्टरांच्या मते दोन्ही मुलींना गर्भातच आईमुळे संसर्ग झाला आहे. मात्र दिलासादायक बाब अशी आहे की, काही दिवसातच त्या मुली रिकव्हर झाल्या.

त्या मुलींना १४ दिवस क्वॉरंटाईन ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर केवळ त्यांचे वडिल आरोन यांनी त्यांना पाहिले. तब्बल सहा आठवड्यानंतर डॉक्टरांनी मुलींना फिट आणि कोरोनामुक्त घोषित केले. आता त्या मुली आपल्या घरी जाण्यासाठी तयार आहेत. त्यांची आई सारा यांनी म्हटले आहे की, मी खुप घाबरले होते. जेव्हा मला समजले की त्या दोघी कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तेव्हा मला स्वतःचा खुप राग आला होता.

हेही वाचा –

लॉकडाऊन संदर्भातील खोट्या बातम्यांमुळे मजुरांचं स्थलांतर – केंद्र सरकार