घरदेश-विदेशफक्त २४ मिनिटांत रिझल्ट देणारं 'कोरोना टेस्ट किट' TATA समूहाकडून लाँच

फक्त २४ मिनिटांत रिझल्ट देणारं ‘कोरोना टेस्ट किट’ TATA समूहाकडून लाँच

Subscribe

टाटाच्या टेस्ट किटचे नाव 'TataMD CHECK' असे ठेवण्यात आले असून CSIR-IGIB सोबत मिळून हे टेस्ट किट बनविण्यात आले आहे

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असला तर कोरोनाबाधित रूग्ण शोधण्यासाठी आजही कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना लॉकडाऊन दरम्यान हजारो कोटी रुपयांची मदत करून टाटा ग्रुपने मोठी मदत केली होती. मात्र आता टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिकने कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन टेस्ट किट लाँच केले आहे. या नव्या कोरोना किटच्या मदतीने परदेशी टेस्ट किटवर होणाऱ्या खर्चाची देखील बचत होणार असून मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यास सोयिस्कर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटाच्या टेस्ट किटचे नाव ‘TataMD CHECK’ असे ठेवण्यात आले असून CSIR-IGIB सोबत मिळून हे टेस्ट किट बनविण्यात आले आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, टाटाने लाँच केलेले हे टेस्ट किट चिनी टेस्ट किटपेक्षा जास्त परिणामकारक आणि सोपे आहे. टाटाने तयार केलेले हे कोविड-१९ टेस्ट किट्स डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच आयसीएमआर आणि डीसीजीआयने या चाचणी किटला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० लाख किट चेन्नईतील टाटा फॅक्टरीमध्ये बनविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हे किट भारतात विकसित करण्यात आले असून इमेज बेसड रिझल्ट तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे. या किटसाठी स्टँडर्ड लॅबोरेटरी यंत्रणा लागणार असून लॅबोरेटरीमध्ये चाचणी केल्यास ४५ ते ५० मिनिटांत पहिला रिझल्ट मिळू शकणार आहे. TATA ग्रुपकडून लाँच करण्यात आलेल्या कोरोना टेस्ट किटचा वापर ग्रामीण भाग, दुर्गम भागातही आरोग्य सेवक कोरोना चाचणी करू शकणार आहेत. तसेच या टेस्ट किटसाठी फार मोठी यंत्रेही लागणार नाही, असे सांगितले जात आहे.


चिंतेत आणखी वाढ! ‘या’ देशात कोरोना व्हायरसचं रूप बदललं; WHO अलर्टवर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -