Corona : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव कोरोना पॉझिटिव्ह

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना कोरोनाची लागण झाली आहे. समाजवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. आज, बुधवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

यापूर्वी देशात अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी त्यावर मातही केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचाही त्यात समावेश आहे. तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी कोरोनाच्या आजाराचा सामना केला आहे. आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनाही कोरोनाची लागण झाली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा –

‘दुकाने, बार-रेस्टॉरंट दिवसभर खुली; मात्र प्रत्यक्ष महासभेला टाळाटाळ का?’