घरCORONA UPDATEकोरोनाचा विस्फोट! देशात गेल्या २४ तासात ५५,०७९ नवे रूग्ण; ७७९ जणांचा मृत्यू

कोरोनाचा विस्फोट! देशात गेल्या २४ तासात ५५,०७९ नवे रूग्ण; ७७९ जणांचा मृत्यू

Subscribe

१० लाख ५७ हजार ८०६ कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केला असून रूग्णालयातून डिस्चार्ज

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५५ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७७९ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३५ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे.

- Advertisement -

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ झाली आहे तर सध्या ५ लाख ४५ हजार ३१८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तसेच १० लाख ५७ हजार ८०६ कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केला असून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रभावित देश

अमेरिका, ब्राझील, भारत यासारख्या देशांत कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत जगभरात २ लाख ८० हजार नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ६ हजार २२१ लोक मरण पावले आहेत. कोरोना संक्रमणाच्या संख्येनुसार भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक प्रभावित असणारा देश आहे. अमेरिकेनंतर कोरोना महामारीचा सर्वाधिक परिणाम ब्राझीलला झाला आहे.

- Advertisement -

१८ देशांत बाधितांचा आकडा २ लाखांवर

जगातील १८ देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २ लाखांच्या पार गेली आहे. यामध्ये इराण, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया, इटली, जर्मनी आणि बांगलादेशचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक संक्रमित रूग्ण संख्येत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.


जगात आतापर्यंत ६ लाख ७६ हजारांहून अधिक मृत्यू; २४ तासात २ लाख ८० हजार नवे रूग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -