चीनचा नवा दावा; गेल्या वर्षातच कोरोनाचा फैलाव जगभर झाला होता, पण…

” चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीने या प्रकरणावर पडदा टाकल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी केला होता.

चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरासह देशात या व्हायरसमुळे कित्येकांचा बळी देखील गेला आणि अद्याप जात आहे. दरम्यान चीनने शुक्रवारी असा दावा केला की कोरोना विषाणूचा संसर्ग गेल्या वर्षीच जगातील विविध भागात पसरला होता. मात्र, या संदर्भात पहिल्यांदा आम्हीच माहिती देत कारवाई केली असल्याचे चीनने सांगितले आहे.

जीवघेणा व्हायरस हा वुहानमधील जैव प्रयोगशाळेतून पसरल्याचा अमेरिकेचा आरोप देखली चीनने फेटाळून लावला. तर या व्हायरसच्या प्रादुर्भावाशिवाय माणसांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी चीनी शहरात वटवाघूळ किंवा पॅनगोलिनमधून याचा प्रसार झालाच नाही, असेही चीनने म्हटले आहे.

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, “कोरोना व्हायरस हा एक नवीन प्रकारचा विषाणू आहे, कारण अधिकाधिक तथ्य आणि अहवाल समोर येत आहेत.” चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीने या प्रकरणावर पडदा टाकल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटर’ च्या मते, जगभरात ३ कोटी ६० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दहा लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीने अमेरिका हा जगातील सर्वात जास्त प्रभावित देश आहे. जेथे ७६ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर २,१२,००० पेक्षा जास्त लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात सीपीसी पॉलिट ब्युरोने साथीच्या रोगाबद्दल चर्चा केली असून चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे ९०,७३६ लोक बाधित झाले तर कोरोनामुळे ४,७३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर यासंदर्भात ३१ प्रांत आणि नगरपालिकांची बैठक बोलावली होती. ते म्हणाले, “चीनने वुहानमध्ये २३ जानेवारीला लॉकडाउन लावले होते. त्यावेळी चीनबाहेर कोरोना संक्रमितांची केवळ ९ केसेस होत्या. तर अमेरिकेत फक्त एक केस सापडली होती, असे त्यांनी सांगितले.


Corona in India: देशात बाधितांचा आकडा ६९ लाखांवर; २४ तासांत ७३,२७२ नवे रूग्ण