घरताज्या घडामोडीनव्या वर्षात देशातील सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन; केंद्राचा निर्णय

नव्या वर्षात देशातील सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन; केंद्राचा निर्णय

Subscribe

पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांमध्ये ड्राय रन यशस्वी झाल्यानंतर आता देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ड्राय रनचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. सुरुवातीला केंद्र सरकारने चार राज्यांमध्ये ड्राय रनचे आयोजन केले होते. हे आयोजन यशस्वी झाल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांमध्ये ड्राय रन यशस्वी झाल्यानंतर आता देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ड्राय रनचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्यांच्या प्रतिनींसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक राज्यांमध्ये ड्राय रन घेण्यासाठी चर्चा करण्यात असून तारखाही निश्चित करण्यावर चर्चा झाली आहे. प्रत्येक राज्यांमध्ये दोन ठिकाणी कोरोना लसणीकरणासाठी ड्राय रनचं आयोजन केले जाणार आहे. कोरोना लसीचा साठा केलेला डेपो ते कोरोना लसीकरणाचे ठिकाणांवर पोहोचण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्रायरनचे आयोजन केले जाणार आहे.

- Advertisement -

ड्राय रन म्हणजे काय?

कोणतीही लस लोकांना देण्यापूर्वी त्या लसीची तपासणी केली जाते. कारण जर त्या लसीमध्ये काही समस्या किंवा त्रुटी आढळल्यास त्यात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे ड्राय रन केल्याशिवाय लसीचा डोस लोकांना दिला जात नाही. केवळ त्या लोकांचा डेटा अपलोड केला जातो. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेंट आणि ऑनलाइन डेटा सिक्युरिटी यासारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या जातात.

‘को-विन’ नावाचे मोबाइल App

ड्राय रन डेटा कनेक्ट करण्यासाठी आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी सरकारने ‘को-विन’ नावाचे मोबाइल App तयार केले आहे. यामध्ये ड्राय रनशी संबंधित सर्व माहिती अपलोड केली जाणार आहे. विशेष म्हणजे डोस घेतल्यावर तुम्हाला या App च्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. यामुळे आपण लसीचा संपूर्ण डोस घेतल्याचा हा पुरावा असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -