घरदेश-विदेश१३ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ

१३ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ

Subscribe

कोरोनावरील लसीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. त्यामुळे १३ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने देशाला ‘न्यू इयर गिफ्ट’ देत भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवीशिल्ड लसीला ३ जानेवारी रोजी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या मंजुरीपासून १० दिवसांच्या आत म्हणजेच देशात १३ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

लसीकरण करणार्‍या एका टीममध्ये ५ जणांचा समावेश असणार आहे. कोरोना लसीच्या साठ्याबाबत माहिती देताना राजेश भूषण यांनी देशात कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे प्राथमिक लस स्टोअर बनविण्यात आले आहेत. देशात असे एकूण ३७ लस साठवणुकीचे स्टोअर सज्ज आहेत. या ठिकाणांवर लस साठवली आणि तिथूनच इतर ठिकाणी वितरीत केली जाईल, असेही भूषण यांनी सांगितले. देशात लसीच्या वाटपावर डिजिटल पद्धतीने नियंत्रण ठेवले जाणार आहे. गेल्या १० वर्षांपासूनच ही सुविधा भारतात उपलब्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

रुग्ण संख्येत घट
देशात कोरोनाला अटकाव घालण्यात यश येत असल्याचेही राजेश भूषण यांनी सांगितले. गेल्या ११ दिवसांत दर दिवसाला ३०० हून कमी मृत्यू होत आहेत. देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट केवळ १.९७ टक्के इतका असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४३.९६ टक्के रुग्णांवर रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर ५६.०४ टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -