घरताज्या घडामोडीCoronavirus: होय ! माझ्यावर करा करोनाची चाचणी, २ मुलांची आई ठरतेय अमेरिकन...

Coronavirus: होय ! माझ्यावर करा करोनाची चाचणी, २ मुलांची आई ठरतेय अमेरिकन सुपर मॉम

Subscribe

अमेरिकेत करोनावर उपचारासाठी लसीचा शोध लावण्यात आला आहे. या लसीची चाचणी एका महिलेवर करण्यात आली आहे.

करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. वुहाम शहरातून पसरलेला करोना जागतिक महामारी झाला आहे. चीनमधून करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी इतर देशांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. करोना विषाणू आजाराला तीन महिने होत आले आहेत. मात्र, अद्याप करोनावर औषध आलेले नाही आहे. करोनावर आता अमेरिकेत लसीचा शोध लावण्यात आला आहे. या लसीची चाचणी एका महिलेवर करण्यात आली आहे.

जेनिफर हॅलर या ४३ वर्षिय अमेरिकेतील महिलेवर करोना लसीची चाचणी करण्यात आली आहे. जेनिफर हॅलर ही दोन मुलांची आई असून जगातील पहिली व्यक्ती आहे, जिच्यावर करोनाच्या लसीची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही लसीच्या चाचणीसाठी तंदुरुस्त व्यक्तीची गरज असते. कारण, त्या व्यक्तीवर त्या रोगाचा प्रयोग करण्यात येत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. असे असताना देखील जेनिफर हॅलर हिने करोनाच्या विळख्यातून जगाची सुटका व्हावी म्हणून पुढे आली आहे. जेनिफर हॅलरच्या या धाडसाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Hats Off राजेश टोपे! आई आयसीयूमध्ये मात्र चिंता राज्याची!


देशभरात करोनाचे २ लाख २१ हजार २१५ रुग्ण आहेत. तर करोनाने ८ हजार ९७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनाचे सर्वात जास्त ८०, ९२८ रुग्ण चीनमध्ये आहेत. त्यांनतर इटलीमध्ये ३५, ७१३ करोना बाधित आहेत. देशातही करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. देशात करोनाचे १६६ रुग्ण आहेत. तर ३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८४ हजार ९५९ करोनोचे रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -