घरCORONA UPDATEकोरोनाची लस तयार, नाकातून ड्रॉपद्वारे दिली जाणार

कोरोनाची लस तयार, नाकातून ड्रॉपद्वारे दिली जाणार

Subscribe

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जगभरातील संशोधक कामाला लागले असून भारतातही संशोधक कोरोनाची लस तयार करत आहेत. याचदरम्यान हैदराबाद येथील भारत बायोटेकने कोरोफ्लू नावाची लस तयार केली आहे. पण ही लस इंजेक्शनद्वारे शरीरात दिली जाणार नसून सिरिंजद्वारे रुग्णाच्या नाकात तिचे थेंब टाकले जाणार आहेत.

या लसीचे नाव कोरोफ्लूः वन ड्रॉप कोविड-19 नेसल वैक्सीन असे असणार आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याआधीही कंपनीने फ्लूवर अनेक लस तयार केल्या आहेत. भारत बायोटेक व युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मेडिसिन आणि फ्लूजेन या तीन कंपन्या संयुक्तपणे ही लस तयार करत आहेत. ही लस फ्लूचे औषध असलेल्या एम2एसआरच्ाय धर्तीवर तयार करण्यात आली आहे. लस शरीरात जाताच कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज बनवण्यास सुरुवात करते. सध्या या लसीची प्राथमिक चाचणी सुरु असून लवकरच तीचा प्रयोग मानवावर करुन तिला अंतिम रुप दिले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -