हुश्श! अखेर कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादनाला सुरूवात!

कोरोनाची लस तयार करण्यात रशिया यशस्वी ठरली आहे.

corona vaccine
लस

जगभरात कोरोना व्हायरसच्या लशीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. जगभरातील सगळेच लोक त्या लशीची आतुरतेने वाट बघत आहेत. शास्त्रज्ञही या लसीच्या संशोधनासाठी आहोरात्र प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्यात कोरोनाची लस तयार करण्यात रशिया यशस्वी ठरली आहे.

रशियात पुढील महिन्यापासून कोरोना लशीचं उत्पादन सुरू करणार आहे. रशियाच्या एका एजन्सी टीएएसएसने सांगितले की सध्या देशाच्या गरज पूर्ण करण्यासाठी कोरोना व्हायरसची लस बनविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीचं उत्पादन सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल.

कोरोना व्हायरसच्या लसीचा ट्रायल शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. या लसीला गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ ऐपीडेमीलॉजी अंड मायक्रोबायॉलॉडी तयार करीत आहे. या लसीचं ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी घेणारे सर्वांमध्ये इम्युनिटी दिसत आहे. अशी माहिती रशियाचे संरक्षणमंत्री यांनी दिली.

WHO म्हणतं ‘रामबाण उपाय’ नाहीच

WHOने सोमवारी म्हटले आहे की, लस तयार करण्याची शर्यत सुरू झाली असली तरीही कोरोनावर कोणताही ‘रामबाण उपाय’ कदाचित कधीच मिळू शकणार नाही. WHOने असेही म्हटले आहे की भारतासारख्या देशात ट्रान्समिशनचे दर खूप जास्त आहेत. त्यामुळे या सारख्या देशाने कोरोनाच्या युध्दासाठी कायम सज्ज असणं गरजेचं आहे.


हे ही वाचा – सुशांतने मला आत्महत्या करण्यापासून थांबवलेलं,डान्स कोरीओग्राफरने केला खुलासा!