घरदेश-विदेशकोणतीही लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही; WHO च्या प्रमुखांचं वक्तव्य

कोणतीही लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही; WHO च्या प्रमुखांचं वक्तव्य

Subscribe

टेड्रोस घेब्रियेसिस यांनी सोमवारी बोलताना सांगितलं की, कोरोनाची लस आल्यानंतर ते या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवू शकणार नाही.

जगभरासह देशात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. दरम्यान जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात असताना कोरोनावर मात करणाऱ्या लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र अशापरिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठे विधान केल्याचे समोर आले आहे. कोणतीही लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही, तसेच कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही, असे खळबळजनक वक्तव्य घेब्रियेसिस यांनी केले आहे. दरम्यान कोरोनामुळे लाखो लोकांचे जीव गेल्याने संपूर्ण जग कोरोनावर औषध किंवा लस कधी येणार याची वाट पाहत आहे. मात्र डब्ल्यूएचओने केलेल्या या मोठ्या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टेड्रोस घेब्रियेसिस यांनी सोमवारी बोलताना सांगितलं की, कोरोनाची लस आल्यानंतर ते या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवू शकणार नाही. लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल. परंतु, ही लस त्यांची जागा घेऊ शकणार नाही.

- Advertisement -

कोरोना लस येण्यापूर्वी सुरुवातीच्या दिवसांत याच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं जाईल आणि हेल्थ वर्कर्स, वयोवृद्ध माणसं आणि इतर अशा व्यक्ती ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यांच्यापर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्यात येईलनंतर अशी अपेक्षा आहे की, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत घट होईल आणि आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यास मदत होईल, असेही टेड्रोस यांनी सांगितले होते.


भारत बायोटेकची कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -