घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona Vaccine: WHO ची फायझर लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता

Corona Vaccine: WHO ची फायझर लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने फायझर बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालीन वापरासाठी गुरुवारी ३१ डिसेंबरला म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी मान्यता दिली आहे. कोरोनाच्या एखाद्या लसीला पहिल्यांदाच WHO ने मान्यता दिली आहे. WHO च्या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयातीचा आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सर्वात आधी ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा तसंच युरोपिअन युनिअन देशांनीही फायझर लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती.

लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देताना WHO ने म्हटलं आहे की, कोरोना महामारी आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापराला परवानगी मिळालेली फायझर-बायोटेक ही पहिलीच लस आहे. “प्राथमिकता असणार्‍या लोकसंख्येपर्यंत लस पोहोचावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात जागतिक प्रयत्नांची गरज आहे यावर मी भर देऊ इच्छिते. संपूर्ण जगाला करोना लस उपलब्ध व्हावी या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं आहे. मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे.

- Advertisement -

WHO ने आपल्या तज्ज्ञांसह जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायझर-बायोटेक लसीची सुरक्षा, दर्जा आणि गुणवत्तेच्या माहितीची पडताळणी करायला सांगितली होती. तज्ज्ञांनी लसीचे फायदे आणि जोखिमांचं मूल्यांकन केलं. WHO ने निश्चित केलेल्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर ही लस परिणामकारक ठरली. त्यामुळे WHO ने या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -