घरCORONA UPDATECoronavirus: ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण

Coronavirus: ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण

Subscribe

प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नीची करोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

करोनाने जगभर थैमान घातले आहे. करोनाने आता ब्रिटनच्या राजघराण्यावरही हल्ला केला आहे. ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रिन्स चार्ल्स यांची करोनाची चाचणी केली असता करोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. याबाबतची माहिती क्लेरेन्स हाऊसच्या प्रवक्त्याने दिली आहे. प्रिन्स चार्ल्स यांच्यामध्ये “सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. अन्यथा त्यांची तब्येत चांगली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून नेहमीप्रमाणे घरी काम करत आहेत,” असे प्रवक्त्याने सांगितले. कॅमिला पार्कर बाउल्स यांचीही चाचणी घेण्यात आली परंतु त्यांना करोना व्हायरसचा संसर्ग झालेला नाही.


हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत करोनाचा कहर; दिवसात दहा हजार नवे रुग्ण

शासकीय आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रिन्स आणि डचेस आता स्कॉटलंडच्या घरी आयसोलेशनमध्ये आहेत. अ‍ॅबर्डीनशायरमधील एनएचएसने या चाचण्या घेतल्या.

- Advertisement -

प्रिन्स चार्ल्स यांना कोविड -१९ चा संसर्ग कसा झाला हे अद्याप अनिश्चित आहे. “अलिकडच्या आठवड्यांमध्ये सार्वजनिक भूमिकेत मोठ्या प्रमाणात व्यस्त होते, असे प्रवक्त्याने सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -