Corona : त्वचेत ९ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा खुलासा

कोरोनाचा विषाणू मानवाच्या त्वचेत कितीतरी तास जीवंत राहू शकतो. याबाबत एका अभ्यासात खुलासा करण्यात आला आहे. या अभ्यासात असेही निदर्शनात आले आहे की, कोविड १९ चा संसर्ग बहुतांश एरोसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतो. क्लीनिकल इंफेक्शियस डिसीजमधील पत्रिकेत हे परिक्षण छापून आले असून यात संशोधकांनी म्हटले आहे की SARS-CoV-2 पासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. या संशोधनात कॅडेवर प्रकारच्या त्वचेचा वापर करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या नुसार एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, इंफ्लूएंजासारखे घातक विषाणूदेखील मानवाच्या त्वचेत २ तासांहून जास्त टिकत नाहीत. मात्र कोरोनाचा विषाणू ९ तासांहूनही अधिक काळ त्वचेवर टिकून राहतो.

संशोधकांच्या मते, ८० टक्के अॅल्कोहोल असणारे सॅनिटायझरदेखील फक्त १५ सेकंदच कोणत्याही विषाणूला त्वचेपासून गायब करू शकतात. युएस फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीवेंशनसुद्धा अॅल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने हात धुण्याचा सल्ला देतात. सॅनिटाझर किंवा साबणाने २० सेकंदपर्यंत हात धुतल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पूर्णपणे संपू शकतो. देशासह जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून बाधितांचा आकडा ३ कोटींच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमीत कमी व्हावा यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा –

हाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न; ४ जणांना अटक