घरदेश-विदेशअँटिबॉडीजवर मात करणारा कोरोना विषाणू आढळला मुंबईत

अँटिबॉडीजवर मात करणारा कोरोना विषाणू आढळला मुंबईत

Subscribe

मुंबईतील तीन रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा स्ट्रेन

कोरोनाच्या ब्रिटन स्ट्रेनने हाहा:कार माजवला असताना मुंबईतील तीन रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा स्ट्रेन सापडला आहे. हा कोरोनाचा विषाणू इतका घातक आहे की, त्याच्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नाही, असे सांगितले जाते.

मुंबई उपनगरातील खारघरमध्ये टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. या स्ट्रेनला E484K असे म्हणतात. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहे. हे कोरोना विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या तीन स्ट्रेन (K417N, E484K आणि N501Y) मधून आले आहेत. टाटा मेमोरियल सेंटरचे होमिओपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पाटकर यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने ७०० कोविड-१९ नमुन्यांच्या जिनोमच्या सिक्वेंसिंगच्या माध्यमातून पडताळणी केली होती. यापैकी तीन नमुन्यांमध्ये E484K स्ट्रेन मिळाला आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन यासाठी चिंताजनक आहे. कारण जुन्या विषाणूमुळे शरीरात प्रतिरोधक क्षमतेमुळे तयार झालेली तीन अँटिबॉडी यावर प्रभावहीन आहेत.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या म्युटेंटला ब्रिटनमधील विषाणूपेक्षा अधिक धोकादायक सांगण्यात येत आहे. लस अँटिबॉडी बनवण्याच्या सिद्धांतावर काम करते. दरम्यान, संशोधक हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, कोरोनाच्या या म्युटेंटचा जगभरात सुरु झालेल्या लसीकरणावर काय परिणाम होणार आहे. ज्या तीन रुग्णांमध्ये कोरोनाचा हा स्ट्रेन आढळून आला होता ते गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कोरोना संक्रमित झाले होते. तिघांचे वय ३०, ३२ आणि ४३ वर्षे आहे. यापैकी दोन रुग्ण रायगड आणि एक ठाण्यातील आहे. यापैकी दोघांमध्ये कोरोनाची साधारण लक्षणे दिसून आली होती. त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णालाही ऑक्सिजन सपोर्ट किंवा व्हेंटिलेटरची गरज भासली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -