घरताज्या घडामोडीCoronavirus: कनिका म्हणते, 'मला रुग्णालयात धमकावलं जातंय'

Coronavirus: कनिका म्हणते, ‘मला रुग्णालयात धमकावलं जातंय’

Subscribe

लंडनहून आल्यानंतर कनिकाने पार्ट्यांमध्ये भाग घेतला होता. यावरुन तिला आता टार्गेट केलं जात आहे.

‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूरला करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. शुक्रवारी कनिका कपूरची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालामध्ये करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तिला लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीतील रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टर्स तिला धमकावत असल्याचा आरोप कनिकाने केला आहे.

“मला आताच्या घडीला ताप आहे. मी आता रुग्णालयात आहे. इथे खाण्यासाठी काहीच नाही आहे. पाणी देखील नाही आहे. मी अस्वस्थ आहे. माझी चौकशी कशी होईल हे मला माहिती नाही. डॉक्टर्स मला धमकावले आहे. तु खूप मोठी चूक केली आहेस. तु तपासणी न करता एअरपोर्टवरुन पळाली आहेस, असे मला इथले डॉक्टर्स बोलत आहेत. मला माहित नाही या गोष्टी कुठुन येत आहेत. रुग्णालयात मला मदत न करता मला धमकावले जात आहे. मी क्वॉरंटाईन आहे. रुग्णाला धमकाऊ तरग नका. कोणाला काहीही बोलणार का? माझ्या बाबतीत अफवा पसरवल्या आहेत. मी भारतात विमानतळावर होणाऱ्या तपासणीपासून कशी पळून जाईन? मी शिक्षित आहे, मी खूप मेहनत करते. मला नाही माहिती या अफवा कोणी पसरवल्या.” असे गायिका कनिका कपूरने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: करोनाची लागण होऊन सुद्धा ‘या’ प्रसिद्ध गायिकेने केली पार्टी


माझी विमानतळावर पूर्ण स्कॅनिंग करण्यात आली. गेल्या ३-४ दिवसांपासून माझी तब्येत खालावली आहे. मी स्व:ता टेस्ट करायला सांगितली. त्यांना टेस्ट करायला दोन दिवस लागले. मी तीन दिवस कुठे नाही गेली. काल माझ्या दबावानंतर संध्याकाळी त्यांनी माझी चाचणी घेतली आणि मला कळाले की मला करोना आहे. मी ९ तारीखला लंडनहून परतली. मी तिथे माझ्या मुलांना भेटायला गेली होती. माझीमुले तिथे शिकतात. मी लखनऊला माझ्या पालकांकडे आली आहे.

- Advertisement -

जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला, तेव्हापासून खबरदारी घेत आहे. मी तीन पार्ट्यांमध्ये भाग घेतलेला नाही. एक वाढदिवसाची पार्टी होती जी एक गेट टू गेदर होते, असे कनिकाने म्हटले आहे. कनिकाने तीन पार्ट्यांमध्ये भाग घेतल्याचे फेटाळले आहे. मी ३००-४०० लोकांची कोणतीच पार्टी केली नाही. माझे वडील असे सांगू शकत नाहीत. ज्यावेळी मी लंडनला गेली होती त्यावेळी करोनाचा प्रादुर्भाव एवढा नव्हता. मला कोणी १४ दिवस वेगळे रहायला सांगितले नव्हते, असे कनिका म्हणाली.


हेही वाचा – करोनाग्रस्त गायिकेच्या संपर्कातील राज्यस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार ‘क्वारंटाईन’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -