घरदेश-विदेशकोरोनाची धडकी! २४ तास रूग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात पडून...

कोरोनाची धडकी! २४ तास रूग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात पडून…

Subscribe

त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह इतर रुग्णांसह २४ तास रुग्णालयाच्या आवारातच होता.

बिहारमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे. या साथीच्या लढाई दरम्यान, रुग्णालय आणि आरोग्य केंद्राने बर्‍याच वेळा अनागोंदी कारभार केल्याचे समोर आले आहे. परंतु बिहारमधील रोहतास रुग्णालयात असे काही घडले याची कल्पनाही करता येणार नाही.

रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज उपविभागीय रुग्णालयात एक बेवारस मृतदेह २४ तास तसाच पडून राहिला, पण कोणीही त्या मृतदेहाला हात लावला नाही किंवा त्याला तेथून हलवले नाही. तेथे उपचार घेत असलेल्या इतर लोकांना त्या मृतदेहाभोवती राहण्यास भाग पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी एकाच रूग्णाचा या रुग्णालयात मृत्यू झाला.

- Advertisement -

त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह इतर रुग्णांसह २४ तास रुग्णालयाच्या आवारातच होता. ही माहिती रूग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांना देण्यात आली असता त्याने वेगळाच दावा केला आणि या प्रकरणातून पळ काढला. त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला, हे रुग्णालयाकडून अद्याप सांगण्यात आले नाही.

आजतकने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर म्हणाले की, मी सध्या पूर्णपणे थकलो आहे, म्हणून मी आत्ता काहीही सांगण्याच्या किंवा बोलण्याच्या मनस्थितीत नाही. कोरोना कालावधीमधील डॉक्टरांच्या या उत्तरावरुन असे लक्षात येईल की, येथील आरोग्य यंत्रणेची स्थिती नेमकी कशी असू शकते. दरम्यान, हे पहिले प्रकरण नाही. सासाराम जिल्हा मुख्यालयात कोरोना बाधित रूग्णाच्या मृत्यूच्या चार दिवस आधीही त्याचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारातच असाच बेवारस सारखा पडून होता. तर कुटुंब त्या मृतदेहासह उपस्थित असूनही आरोग्य विभागाने मृतदेहाच्या विल्हेवाट लावण्यासाठी १२ तास घालवले असल्याचे सांगितले जात आहे.


Coronavirus: देशात बाधितांचा आकडा २० लाखांपार! २४ तासात ६२,५३८ नवे रूग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -