WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञांचा दावा; २०२२ वर्षापर्यंत कोरोनापासून सुटका नाही!

२०२२ च्या आधी आयुष्य पूर्वपदावर येणे शक्य नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केला आहे.

WHO चीफ साइंटिस्ट सौम्या स्वामीनाथन
Advertisement

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना जग कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळणाऱ्या प्रभावी लसची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, डब्ल्यूएचओ ची चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या निवेदनामुळे लोकांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व परिस्थिती पूर्ववत येण्यासाठी २०२२ पूर्वी पुरशा प्रमाणात लसींची उपलब्धता होणे कठीण आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. कोविड काळ संपून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी किमान आणखी दोन वर्ष जातील. म्हणजे २०२२ च्या आधी आयुष्य पूर्वपदावर येणे शक्य नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केला आहे.

पुढे स्वामीनाथन म्हणाले, “डब्ल्यूएचओच्या कोवॅक्स उपक्रमांतर्गत विविध स्तरातील उत्पन्नासह देशांमध्ये ही लस योग्य पद्धतीने दिली जाईल.” यासाठी कोट्यावधी डोस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तयार करावे लागतील. याचा अर्थ असा आहे की सर्व १७० देश किंवा त्याच्याशी संबंधित अर्थव्यवस्थांना काहीतरी हातभार नक्की लागेल. ‘

मात्र लसीचे उत्पादन होईपर्यंत मास्क घालण्याची गरज आहे आणि सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. २०२१ च्या अखेरीस, लसीचे दोन अब्ज डोस मिळवण्याचे लक्ष्य असणार आहे, तर येत्या २०२१ च्या मध्यात कोरोनावरील लस येईल. मात्र सर्वांपर्यंत लस पोहोचायला २०२२उजाडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ६० ते ७० टक्के लोकांना लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे लस बाजारात आली की लगेच आपण निर्धास्त होण्यासारखी परिस्थिती नाही. सध्या कोरोना व्हायरस निर्मुलनाकडे नाही तर नियंत्रणात ठेवण्यावरच भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आम्हाला फक्त लसीचा परिणाम पहायचा आहे, परंतु लोकांच्या दृष्टीने सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे असे मला वाटते. यूएस एफडीए (अन्न व औषध प्रशासन) लवकरच लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. तसेच जुलैपासून चीन आपल्या अधिकाऱ्यांवर ‘इमरजेंसी यूज ऑथोराइजेशन’ अंतर्गत तीन लसी वापरत आहे. जूनपासून सैनिकांवर लस वापरली जात आहे. देशातील फार्मास्युटिकल कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत देशात लाखो लोकांना लस देण्यात आली आहे.


धक्कदायक! पुण्यात होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीनं नैराश्यामुळं घेतला गळफास