Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे देशात ३८ रुग्ण

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे देशात ३८ रुग्ण

Related Story

- Advertisement -

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दुपारी याबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन प्रथम ब्रिटनमध्ये दाखल झाला होता, जो 70 टक्के जास्त संसर्गजन्य आहे.

शनिवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितले की, ब्रिटनमध्ये समोर आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला भारताने यशस्वीरित्या ‘कल्चर’ केले आहे. ‘कल्चर’ ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे पेशींना नियंत्रित स्थितीत निर्माण केले जाते, सामान्यत: नैसर्गिक वातावरणाच्या बाहेर असे केले जाते. ब्रिटनमध्ये नवीन स्ट्रेनचे यशस्वीरित्या वेगळे आणि कल्चर करण्यात आले आहे. यासाठी ब्रिटनहून परत आलेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.

- Advertisement -

भारतात रोज नोंदल्या जाणार्‍या नव्या कोविडबाधितांच्या संख्येतील घसरण कायम राहिली आहे. गेल्या 24 तासांत, देशपातळीवरील कोविड बाधितांच्या संख्येत 16,504 नव्या बाधितांची वाढ झाली. प्रतिदिन नोंद होणार्‍या नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे, देशातील सक्रिय कोविडग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंतच्या एकूण कोविडग्रस्तांची संख्या लक्षात घेता आता देशात फक्त 2.36 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण कोविडग्रस्तांची संख्या 3,267 ने कमी झाली.

- Advertisement -