CoronaVirus: मिठाईवाल्याचं कोरोना प्रेम! बनवली ‘कोरोना’ मिठाई!

Kolkata
coronavirus a picture of the corona sandesh posted on twitter gone viral
CoronaVirus: मिठाईवाल्याचं कोरोना प्रेम! बनवली 'कोरोना' मिठाई!

बंगालमधील नागरिकांना मिठाईवर खूप प्रेम आहे, हे संपूर्ण जगाला माहित आहे. पण ही बातमी वाचल्यानंतर ज्यांना माहिती नाही त्यांनी देखील खात्री पटेल. एका बाजूला संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला याचदरम्यान कलकत्तामधील एका मिठाईवाला कोरोना व्हायरससारखी हुबेहूब मिठाई बनवून विकत आहेत. बंगालच्या एका महिलेने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोना व्हायरसच्या मिठाईचा फोटो शेअर केला आहे.

हा फोटो शेअर तिने असं लिहिलं की, कोणी आपल्या मुलाचे नाव कोरोना आणि कोविड असं ठेवतं आहे. तर बंगालचा हा मिठाईवाला कोरोना व्हायरससारख्या मिठाई बनवून विक्री करत आहे. क्रेजी लोक. या फोटोवर अनेक लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, पश्चिम बंगालच्या सरकारने गेल्या आठवड्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉगडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे मिठाईची दुकाने फक्त चार तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना पश्चिम बंगाल व्यापार समितीने मिठाईची दुकाने सुरू ठेवण्याची विनंती केली होती. त्यानंतर सरकारने दररोज फक्त चार तास मिठाईची दुकाने सुरू राहतील अशी अट घातली. पीटीआयच्या वृत्तानुसार मिठाईची दुकाने दुपारी १२ ते संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील, असं सांगण्यात आलं होत.


हेही वाचा – Video: हवेत गोळीबार करणाऱ्या भाजप महिला नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल