घरCORONA UPDATECorona -प्राण्यांच्या शरीरातून मानवात असा प्रवेश करतो व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा!

Corona -प्राण्यांच्या शरीरातून मानवात असा प्रवेश करतो व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा!

Subscribe

या व्हायरसची ही क्षमता आहे ज्यामुळे ते एका प्रजातीपासून दुसर्‍या प्रजातीमध्ये प्रवेश करू शकतो.

देशासह जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनावर लस शोधण्याबरोबरच हा प्राणघातक विषाणू कुठून आला याचा शोधही शास्त्रज्ञ घेत आहेत. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, प्राणांमध्ये असलेल्या कोरोनाचा विषाणू हा आपला आकार बदलतो मानवाच्या शरीरीत सहज शिरू शकतो. त्यामुळे मानवलाही कोरोनाचा शोधा पोहचतो. प्राण्यांमधील नमुन्याचे अनुवंशिक विश्लेषण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

संशोधकांच्या पथकात अमेरिकेच्या एल पासो येथील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांचाही समावेश होता. यावेळी शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की कोरोना सर्वात जवळचा एक विषाणू आहे जो बॅटला संक्रमित करतो. हा अभ्यास सायन्स अ‍ॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की सार्स-कोव्ह -२ विषाणूची मानवांना संक्रमित करण्याची क्षमता पँगोलिनला संक्रमित होणार्‍या कोरोनातील की जनुकांशी संबंधित आहे.

- Advertisement -

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानूसार, हा प्राणघातक विषाणू त्याच्या अनुवांशिक गुणधर्म बदलून संक्रमित व्यक्तीच्या पेशींमध्ये असू शकतो. या व्हायरसची ही क्षमता आहे ज्यामुळे ते एका प्रजातीपासून दुसर्‍या प्रजातीमध्ये प्रवेश करू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते,  या व्हायरसची अशी क्षमता आहे की ती प्रत्येक पेशीमध्ये प्रवेश करू शकतो.

अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीचे संशोधक फेंग गाओ म्हणाले की, एसएआरएस किंवा मार्सप्रमाणे कोरोनाही आपल्या अनुवांशिक गुणधर्मांमध्ये बदल करण्यास सक्षम आहे. त्याच्या गुणांमुळे मणूस आजारी पडतो. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की हा अभ्यास भविष्यात व्हायरसपासून होणाऱ्या साथीच्या आजारांना आळा बसवेल. इतकेच नाही तर हा अभ्यास या विषाणूची लस तयार करण्यातही उपयुक्त ठरेल.

- Advertisement -

हे ही वाचा – जबरदस्त ऑफर! BSNL ग्राहकांना तब्बल ४ महिने देणार मोफत सेवा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -