घरताज्या घडामोडीदेशात २४ तासांत ९,८५१ नवे रुग्ण; २७३ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत ९,८५१ नवे रुग्ण; २७३ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात २४ तासांत ९,८५१ नवे रुग्ण आढळून आले असून २७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ८५१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. त्यापैकी ६ हजार ३४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ०९,४६२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १० हजार ९६० आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला असून महाराष्ट्रात कोरोनाचे ७७ हजार ७९३ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४१ हजार ४०२ सक्रिय रूग्ण असून ३३ हजार ६८१ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत २ हजार ७१० लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दिल्लीत ६५० रूग्णांचा मृत्यू

राजधानी दिल्लीत आतापर्यंत २५००४ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी १४४५६ सक्रिय रुग्ण आहेत. त्याचवेळी, ९८९८ लोक बरे झाले आहेत. याशिवाय ६५० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूची आकडेवारी

तामिळनाडूमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढून २७ हजार २५६ झाली आहे. यापैकी १२ हजार १३४ सक्रिय प्रकरणे असून १४ हजार ९०२ लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये कोरोनाचे १८ हजार ५८४ रुग्ण आढळले आहेत आणि त्यामध्ये ४ हजार ७६२ सक्रिय रूग्ण आहेत. याशिवाय राज्यात ११५५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – २४ तासांत जगात १ लाख २९ हजार नवे कोरोना रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -