घरताज्या घडामोडीबापरे! देशात ५ दिवसांत सापडले लाखभर रुग्ण!

बापरे! देशात ५ दिवसांत सापडले लाखभर रुग्ण!

Subscribe

गेल्या पाच दिवसात १ लाख नवीन रुग्णांची भर पडली असून अवघ्या पाच दिवसांत संसर्गाची प्रकरणे सहा लाखांवरुन सात लाखांवर गेली आहेत.

जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मागील मागील २४ तासांत देशात २२ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ७ लाख ४२ हजार ४१७ वर पोहोचली असून मृतांची संख्या २० हजार ६४२ झाली आहे. तसेच २ लाख ६४ हजार ९४४ active केसेस असून ४ लाख ५६ हजार ८३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दिवसात १ लाख नवीन रुग्णांची भर पडली असून अवघ्या पाच दिवसांत संसर्गाची प्रकरणे सहा लाखांवरुन सात लाखांवर गेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, दर दहा लाख लोकसंख्येमध्ये भारतात बरे होणारे रुग्ण हे १० लाख रुग्णांपेक्षा जास्त आहेत. तर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विषाणूची लक्षणे लवकर ओळखणे आणि प्रभावी व्यवस्थापनाचे श्रेय दिले जाते. तर भारतातील प्रति दहा लाख रूग्ण बरे होण्यासाठी रुग्णांची संख्या ३१५.८ आहे तर देशातील प्रत्येक लोकसंख्येवर रूग्णांची संख्या १८६.३ आहे.

- Advertisement -

मंत्रालयाच्या माहितीनुसार; १६८ चा संदर्भ देताना मंत्रालयाने म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील १ लाख ४५ हजार ३२५ च्या सरासरीच्या तुलनेत भारतातील कोविड – १९ मधील दर दहा लाख लोकसंख्येचे प्रमाण ५०५.३७ आहे. मात्र, देशात १ लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी ११० दिवस लागले आणि केवळ ४९ दिवसांत तो ७ लाखांच्या पलीकडे गेला आहे.

भारताच्या सावधगिरीची, कृतीशील आणि सातत्यांच्या उपाययोजनांमुळे कोविड -१९ उपाय केले गेले आहेत. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या संख्येने बेड खाली आहेत. भारतातील प्रति दहा लाख रुग्ण बरे होण्यासाठी रुग्णांची संख्या ३१५.८आहे. तर देशातील प्रत्येक लोकसंख्येवर रुग्णांची संख्या १८६.३ आहे. -डॉ. हर्षवर्धन आरोग्यमंत्री

- Advertisement -

हेही वाचा – एका शेतकऱ्याच्या मुलाने तयार केली ‘कोरोना’वर लस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -