भारतीय मुलांमध्ये आढळतोय Corona व्हायरसचा घातक सिंड्रोम; जाणून घ्या, लक्षणं

इटली, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेत काही मुलांमध्ये कोरोनाशी संबंधित नवीन सिंड्रोमची नोंद झाली आहे.

आतापर्यंत कोरोना विषाणूच्या सर्व अहवालांमध्ये कोरोना संक्रमित मुलांची संख्या फारच कमी आहे. समोर आलेल्या सर्व रुग्णांमध्ये, कोरोनाची कोणतीही लक्षणे किंवा फारच सौम्य लक्षणे मुलांमध्ये दिसली नाहीत. इटली, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेत काही मुलांमध्ये कोरोनाशी संबंधित नवीन सिंड्रोमची नोंद झाली आहे. या घातक लक्षणांना मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी) असे नाव देण्यात आले आहे. चिंतेची बाब म्हणजे आता ही लक्षणे भारतातील मुलांमध्ये सध्या दिसू लागली आहेत.

इतर देशांच्या तुलनेत भारतात एमआयएस-सी ची फारच कमी रुग्ण आढळली आहेत. एम्स दिल्लीत एमआयएस-सीच्या दोन रुग्णांचा अभ्यास केला गेला ज्यामध्ये असे आढळले की, या मुलांना ताप होता तर बाकीची लक्षणे वेगळी होती. यामध्ये अडीच वर्षाच्या मुलाला कफ, सतत नाक गळणे अशी तक्रार होती तर सहा वर्षाच्या मुलाला ताप आणि शरीरावर पुरळ येणे अशी लक्षणं होती.

मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोममध्ये, मुलांमध्ये ताप येणे, काही अवयव व्यवस्थित कार्य करत नसल्यासारखे लक्षण, शरीर जास्त सूजणं. ही लक्षणे कावासाकी रोगाच्या लक्षणांसारखेच आहेत. तर सेल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, एमआयएस-सी आणि कावासाकी रोगात धमन्यांना होणारे नुकसान व त्याचे लक्षणं थोडी वेगळी होते. अभ्यासानुसार, कावासाकी आणि एमआयएस-सीमध्ये ताप, डोळ्यांना होणारी जळजळ, पायांना व घशाला सूज येणं, पुरळ यासारखे लक्षणे आहेत तर केवळ एमआयएस-सीमध्ये डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, घसा खवखवणे आणि कफ यासारखे लक्षणं वारंवार आढळतात.

वृद्धांप्रमाणे मुलांना मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित कोणताही जुनाट आजार नसतो, त्यामुळे कोरोनाचा गंभीर धोकाही कमी होतो. या झालेल्या अभ्यासानुसार कोरोना संक्रमित मुलांवर उपचार शोधण्यास मदत करू शकतो, कारण १२ वर्षाखालील मुलांना रेमडेसिवीर औषध दिले जाऊ शकत नाही आणि प्लाझ्मा थेरपी देखील दोन दिवसां नंतर परिणाम दर्शवितो.


दिलासादायक! २४ तासात देशातील कोरोना रूग्णांच्या वाढीत घसरण