घरCORONA UPDATECoronavirus: कोरोनामुळे बळींची संख्या ४० हजारांपार! २४ तासांत ९०४ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus: कोरोनामुळे बळींची संख्या ४० हजारांपार! २४ तासांत ९०४ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १३ लाख २८ हजार ३३७ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात या जीवघेण्या विषाणूमुळे ४० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत म्हणजेच बुधवारी सकाळी ८ ते ८ या काळात देशभरात कोरोना विषाणूमुळे ९०४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे ४० हजार ६९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

 

देशात कोरोना विषाणूच्या नव्या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दररोज ५० हजाराहून अधिक कोरोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत यामुळे कोरोना रुग्णांचा आलेख दररोज वाढता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ५६ हजार २८२ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामुळे आतापर्यंत १९ लाख ६४ हजार ५३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात सध्या ५ लाख ९५ हजार ५०१ अॅक्टिव्ह रूग्ण असून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १३ लाख २८ हजार ३३७ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जगात १८ कोटीहून अधिक जण बाधित

जगात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. जगात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली असून सध्या १८ कोटी ९७ लाख ५ हजार २८० जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर आतापर्यंत ७ लाख ११ हजार २२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जगात १२ कोटी १६ लाख ३ हजार ७५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या जगात ६ लाख १० हजार ३०६ जण Active आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात देखील तेवढ्याच वेगाने केली जात आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.


COVID 19 tests: देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाखाहून अधिक चाचण्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -