LIVE UPDATES: मुंबईत २४ तासांत आढळले १,९२९ नवे रुग्ण, ३५ रुग्ण मृत्युमुखी!

News Live Update
ताज्या बातम्यांचे लाईव्ह आपडेट

मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ९२९ नवे रुग्ण आढळले असून ३५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५२ हजार २४वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ७९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत २४ तासांत १ हजार ११० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १ लाख २१ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात गेल्या २४ तासांत १९ हजार २१८ नवे रुग्ण आढळले असून ३७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ६३ हजार ६२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २५ हजार ९६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सुशांतसिंह ड्रग्जप्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एनसीबीकडून शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला दोन तासांत अटक केली जाणार आहे. सध्या फॉर्मल प्रक्रिया सुरू आहे.


विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना लागण झाल्याचे समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.


आयपीएलच्या युद्धाआधीच चेन्नई सुपर किंगला आणखी एक धक्का बसला आहे. सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीने आयपीएलमधून माघार घेतली आहे. वैयक्तित कारणामुळे आयपीएल खेळणार नसल्याचे त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.


रॉयटर्सच्या वृत्तानुसार जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते असे म्हणाले की, २०२१च्या मध्यापर्यंत व्यापक स्वरूपात लसीकरण शक्य नाही.


कोरोना व्हायरसचं पुन्हा होणारं संक्रमण आणि इम्यूनिटीसंदर्भात दिलासादायक बातमी

जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. हाँगकाँग, इटली आणि अमेरिकेत सध्या परिस्थिती सुधारल्यानंतर कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा एकाच व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे प्रकरणे वाढत आहेत, तर दुसरीकडे रोग प्रतिकारशक्तीबद्दल लोकांच्या मनातही प्रश्नही उपस्थित होत आहेत. मात्र एका नवीन अभ्यासानुसार लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. (सविस्तर वाचा)


कोल्हापुरातल्या कलाकारांनी बंगळुरु महामार्ग अडवला आहे. या कलाकारांनी महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.


‘एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले…’

ठाकरे सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून राज्यातील ४० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पण या बदलीच्या आदेशानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. या टीकेवर आज सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा समाचार घेतला आहे. (सविस्तर वाचा)


बिल वाढवण्यासाठी कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला ठेवलं २ दिवस व्हेंटिलेटरवर!

देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येच दिवसेंदिवस वाढ होत असल्याने डॉक्टर्स आणि कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णावर उपचार करत आहे. मात्र अशा परिस्थितीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोलकत्यात घडला असून बिल वाढवण्यासाठी मृत्यू झाल्यावरही कोरोना रुग्णाला २ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. (सविस्तर वाचा)


मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे निधन

मुंबई विद्यापीठाचे माजी कॉलेज व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक आणि मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे गुरुवारी संध्याकळी हृदय विकाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. एन्जिओप्लास्टीसाठी त्यांना चार दिवसांपूर्वी मुलुंड येथील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिक्षणात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. हांडे यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (सविस्तर वाचा)


BRICS देशांच्या बैठकीत आज भारत-चीनचे परराष्ट्रमंत्री आमनेसामने

लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री चकमक झाली. यावेळी चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा देखील प्रयत्न करण्यात आला. यामुळे भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. (सविस्तर वाचा)


‘मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’; कंगनाला मनसेची तंबी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सतत टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. कलाकारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला चांगलच फैलावर घेतलं असून सोशल मीडियावर संताप देखील व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून ‘माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’, असं म्हटलं आहे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही’, असंही ते म्हणाले आहेत.


२४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३९ लाखावर

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात ८३ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या ३९ लाखांवर गेली आहे. तर ६८ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.


सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडाला एनसीबीने घेतले ताब्यात

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाईला सुरुवात केली आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावर आज, शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. रिया – शोविक ड्रग्ज प्रकरणी हा छापा टाकण्यात आला होता. तर, एनसीबीची दुसरी टीम सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडाच्या घरी पोहोचली होती. दरम्यान, एनसीबीच्या पाच सदस्यांकडून अडीच तासाच्य़ा झाडाझडती नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


कर्ज परतफेडीच्या हप्त्यांना स्थगिती; कर्जदारांना दिलासा, बँका मात्र संकटात

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कर्जहप्ते परतफेड स्थगन प्रकरणी अंतरिम आदेश दिला आहे. कोरोना दरम्यान ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत परतफेड स्थगित असलेली कर्जखाती अनुत्पादित मालमत्ता अर्थात ‘एनपीए’ म्हणून घोषित करण्यास न्यायालयाने बँकांना तूर्तास मनाई केली आहे. कोरोना दरम्यान कर्जदारांच्या स्थगित कर्ज-हप्त्यांच्या व्याज रकमेवर व्याज आकारण्याची बँकांनी अनुसरलेली पद्धत गैर आहे, असे स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. (सविस्तर वाचा)


नार्कोटिक्सची दोन पथके रियाच्या घरी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास घेण्यासाठी नार्कोटिक्सची दोन पथके आज सकाळीच रियाच्या घरी दाखल झाली आहे. गेल्या दीड तासांपासून रियाच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) पथक दाखल झाले आहे. तर आता रिया, शौविकरव अटकेची टांगती तलवार दिसून येत आहे. (सविस्तर वाचा)


पुणे-मुंबई रेल्वे प्रवास कधी होणार सुरू? मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासून रेल्वेची सेवा बंद आहे. त्यानंतर १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे सुरू केल्या आहेत. आता राज्य सरकारने जिल्हा बंदी रद्द केली असून प्रवाशांना राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरूवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. (सविस्तर वाचा)


कर्ज परतफेडीच्या हप्त्यांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कर्जहप्ते परतफेड स्थगन प्रकरणी अंतरिम आदेश दिला आहे. कोरोना दरम्यान ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत परतफेड स्थगित असलेली कर्जखाती अनुत्पादित मालमत्ता अर्थात ‘एनपीए’ म्हणून घोषित करण्यास न्यायालयाने बँकांना तूर्तास मनाई केली आहे. कोरोना दरम्यान कर्जदारांच्या स्थगित कर्ज-हप्त्यांच्या व्याज रकमेवर व्याज आकारण्याची बँकांनी अनुसरलेली पद्धत गैर आहे, असे स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. (सविस्तर वाचा)