घरदेश-विदेशCoronaVirus: न्यूयॉर्कसारखी मुंबई बनणार कोरोनाची राजधानी!

CoronaVirus: न्यूयॉर्कसारखी मुंबई बनणार कोरोनाची राजधानी!

Subscribe

भारताची आर्थिक राजधानी कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करतंय...

भारतात कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या रूग्णांनी सर्वाधिक नोंद मुंबई शहरात आहे. अशा परिस्थितीत मुंबई हे भारताचे न्यूयॉर्क बनणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारताची आर्थिक राजधानी कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करतंय… मुंबईत २२ हजार ७०० हून अधिक कोरोनच्या केसेस समोर आल्या आहे तर ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण कोरोना रूग्णांपैकी २१ टक्के कोरोनाबाधित फक्त मुंबईत आहे. त्यामुळे भारतासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

मुंबईतील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असणं आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई आणि न्यूयॉर्क दरम्यान हजारो किलोमीटर अंतर असले तरीही साधारण दोन्ही शहरांची मानसिकता आणि जीवनशैली एकसारखीच आहे. दोन्ही शहरांची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानीचे सारखी असून उंच मोठ्या इमारती, धावपळ असणारी जीवनशैली, परप्रांतीयांचे ठिकाण, श्रीमंत आणि गरीब लोकांचे वास्तव्य असणाऱ्या साधारण १२ हजार ५३० किमी अंतरावर वसलेल्या या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाने अक्षरशः लोकांचे संपुर्ण जीवन उद्धवस्त करून टाकले आहे.

- Advertisement -

ही दोन्ही शहरं आपापल्या देशातील सर्वाधिक कोरोनाने थैमान घातलेली शहरं आहे. मागील जनगणनेनुसार, मुंबई ही न्यूयॉर्कच्या लोकसंख्येच्या दीडपट आहे, मुंबईचे क्षेत्रफळ न्यूयॉर्कच्या दृष्टीने साधारण निम्मे आहे. दोन्ही शहरं दाट लोकवस्तीची असून न्यूयॉर्कमध्ये १ चौरस किलोमीटरमध्ये १० हजार लोकं राहतात तर मुंबईत तेवढ्याच जागेत ३२ हजाराहून अधिक लोकं वास्तव्य करतात. अशा परिस्थितीत मुंबईत सोशल डिस्टेन्सिंग पालणे कठीण झाले आहे.

साडे तीन लाखांहून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण आणि २८ हजारांहून अधिक मृत्यूमुळे न्यूयॉर्कची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर झाली आहे तर मुंबईत २२ हजाराहून अधिक कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ८०० झाला आहे. जेव्हा न्यूयॉर्कमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत होती, तेव्हा रूग्णालयातील बेड, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट्सचा तुटवडा भासत होता, तीच परिस्थिती आज मुंबईतही दिसत असून शासकीय रुग्णालयात औषधे, उपकरणे, कर्मचारी आणि कमतरता भासत असलेल्या खाटांच्या संख्येवरून बघायला मिळत आहे.


Coroanavirus: जगात कोरोनाचा कहर सुरुच; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० लाखपार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -