Tuesday, March 2, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाशी संबंधीत आजारांवर 'भांग' गुणकारी, भारतात चाचणीची शक्यता!

कोरोनाशी संबंधीत आजारांवर ‘भांग’ गुणकारी, भारतात चाचणीची शक्यता!

Related Story

- Advertisement -

कॅनडातील स्टार्टअप असलेल्या अक्सीरा फार्मा कंपनीने भांगेपासून कोरोनावर औषध तयार केले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या विषाणूमुळे होणारा हृद्याशी संबंधित आजाराही दूर करेल असा दावा कंपनीने केला आहे. या औषधाच्या चाचणी भारतात व्हावी यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. अक्सीरा फार्माच्या दाव्यांनुसार करोनाबाधित रुग्णांना हृदयाशी संबंधित एक आजार होतो. याला एरिथिमिया असे म्हणतात. या आजारावर भांग हे औषध अधिक फायदेशीर ठरू शकते असा कंपनीने दावा केला आहे.

अमेरिकेत तसेच कॅनडामधील काही राज्यांमध्ये भांगेला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. भांगेत अनेक औषधी गुणर्धम देखील आहेत असा दावा करण्यात आला आहे. एरिथिमियाच्या आजारात आपल्या हृदयाची धडधड वेगवान अथवा प्रमाणापेक्षा खूपच कमी धीमी होते. या आजारामुळे कार्डिक अरेस्ट अथवा हृदयाशी संबंधित इतर आजाराचा धोका संभावतो.

- Advertisement -

कोरोनासाठी कंपनीने बनवलेल्या औषधाचे नाव Cannabidiol-CBD असे आहे. कंपनीने दावा केला की, त्यांचे औषध विविध प्रकारच्या आजारांवर उपचारासाठी वापरले जाते. केमोथेरेपीमुळे होणारे साइट इफेक्टसही उपचारात मदत करेल असा कंपनीचा दावा आहे. सध्या कॅनडात या औषधाची चाचणी सुरू असून भारतात चाचणी घेण्यासाठी केंद्र सरकारसोबत पत्र व्यवहार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


हे ही वाचा – सुशांतने केदारनाथच्या शुटींगवेळी साराबरोबर घेतले होते ड्रग्ज, रियाने केले असे अनेक खुलासे!


- Advertisement -