घरताज्या घडामोडीगोव्यात कोरोनाची चिंता वाढली; कोरोनाचा चौथा बळी!

गोव्यात कोरोनाची चिंता वाढली; कोरोनाचा चौथा बळी!

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रभावात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. गोव्यात बुधवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. गोव्यात बुधवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मडगावच्या कोविड रुग्णालयात उपचार घेताना मरण आलेल्या रुग्णांची संख्या एकूण चार झाली आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ही ६४ वर्षीय ताळगाव येथे राहणारी होती.

गोव्यात कोरोनाचा आकडा १ हजार पार

गोव्याच्या ताळगाव येथे एका ६४ वर्षीय व्यक्तीला ताप असल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णाला मडगावच्या रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांच्यावर गेले आठ दिवस उपचार सुरु होते. मात्र, तब्येत अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

गोवा राज्य हे पहिले कोरोनामुक्त होणारे राज्य होते. मात्र, ग्रीन झोन नंतर पुन्हा गोव्यातील कोरोनाची आकडेवारी वाढत गेली. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गोव्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर ३० ते ४० रुग्ण बरे होऊन घरीही जात आहेत. गोव्यात आतापर्यंत आठ ठिकाणी कंटेनमेन्ट झोन केले आहेत. गोव्यात पर्यटन व्यवसाय अजून सुरु झालेला नाही. पण, पावसाळा सुरु होताच रुग्ण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमा सील करा, अशी मागणी विरोधी कॉंग्रेस पक्षाने केली. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही मागणी फेटाळून लावत प्रत्येकाने तोंडाला मास्क लावले आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास कोरोनाला नियंत्रणात आणले जाईल, असे देखील मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले.


हेही वाचा – Corona: देशात २४ तासांत ५०७ जणांचा मृत्यू, १८ हजाराहून अधिक नव्या रूग्णांची नोंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -